अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी १०३५ कोटी रुपये वितरीत, पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार? Ativrushti Nuksan Bharpai List 2021
शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२१ मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्यामुळे नुकसानीपोटी शासनाने अतिवृष्टी मदत जाहीर केली होती, मात्र पहिल्या टप्प्यात ७५% रक्कम दिल्यानंतर उर्वरीत मदत कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती, अखेर शासनाने अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत वितरीत करण्यास मान्यता दिली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे, तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे? सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या ह्या लेखामध्ये.
- कोकण विभाग : एकूण मदत – ९७.६२ लाख
जिल्हा: पालघर (एकूण मदत – ९७.६२ लाख)
- पुणे विभाग : एकूण मदत – २० कोटी ०७ लाख
जिल्हा: सोलापूर (एकूण मदत – २० कोटी ०७ लाख)
- नागपुर विभाग : एकूण मदत – ७९.४७ लाख
जिल्हा नागपुर (एकूण मदत – ७१.०९ लाख)
जिल्हा गडचिरोली ( एकूण मदत – ५.११ लाख)
जिल्हा गोंदिया (एकूण मदत – ३.२७ लाख)
- औरंगाबाद विभाग : एकूण मदत – ७६३.७५ कोटी
जिल्हा औरंगाबाद (एकूण मदत – ९८ कोटी ८६ लाख ७३ हजार)
जिल्हा जालना (एकूण मदत – ९३ कोटी २७ लाख ७४ हजार)
जिल्हा परभणी (एकूण मदत – ६७ कोटी ८१ लाख ०५ हजार)
जिल्हा हिंगोली (एकूण मदत – ५६ कोटी १७ लाख ९२ हजार)
जिल्हा नांदेड (एकूण मदत – १३६ कोटी ६९ लाख ७१ हजार)
जिल्हा बीड (एकूण मदत – १४२ कोटी ३१ लाख ०४ हजार)
जिल्हा लातूर (एकूण मदत – ९७ कोटी ४९ लाख ६७ हजार)
जिल्हा उस्मानाबाद (एकूण मदत – ७१ कोटी ११ लाख ३१ हजार)
- अमरावती विभाग : एकूण मदत – ९५ कोटी
जिल्हा अमरावती (एकूण मदत – ४२ कोटी ०२ लाख ३१ हजार)
जिल्हा अकोला (एकूण मदत – ९३ लाख १० हजार)
जिल्हा यवतमाळ (एकूण मदत – ४४ कोटी ३८ लाख ९२ हजार)
जिल्हा बुलढाणा (एकूण मदत – शून्य)
जिल्हा वाशिम (एकूण मदत – ७ कोटी ६६ लाख ६१ हजार)
- नाशिक विभाग : एकूण मदत – १५४ कोटी ३९ लाख ५९ हजार
जिल्हा नाशिक (एकूण मदत – ४७ कोटी ३४ लाख १८ हजार)
जिल्हा धुळे (एकूण मदत – ९ कोटी ७५ लाख १३ हजार)
जिल्हा नंदुरबार (एकूण मदत – २ कोटी ०९ लाख)
जिल्हा जळगाव (एकूण मदत – ७९ कोटी ४२ लाख ६२ हजार)
जिल्हा अहमदनगर (एकूण मदत – १५ कोटी ७८ लाख ६७ हजार)
तर मित्रांनो, अशाप्रकारे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीचा दूसरा टप्पा म्हणून १०३५ कोटी रुपये जिल्हा निहाय वितरित करण्यास शासन मंजूर देण्यात आली आहे, शासन निर्णय वाचण्यासाठी
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता / शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात आले होते.
दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार
दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra
शासन निर्णय :
ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून उर्वरित रु.१०३५००.१४ लाख (अक्षरी रुपये एक हजार पसत्तीस कोटी चौदा हजार फक्त) इतका निधी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांचेमार्फत संबधित जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.