बियाणे अनुदान योजना 2021 | Maha DBT Biyane Anudan Yojana 2021

बियाणे अनुदान योजना 2021 | Maha DBT Biyane Anudan Yojana 2021 



Biyane Anudan Yojana 2021 Maharashtra: आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम सुरू होणार आहे. रब्बी हंगाम करिता राज्य सरकार अनुदानावर बियाणे वाटप करणार आहे.

अन्नधान्य व गळीत पिके या दोन बाबी लक्षात घेऊन जिल्हानिहाय पिके व जिल्हा देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान द्वारा बियाण्यांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.सदर योजना ही Maha DBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या लेखामध्ये योजना बद्दल संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. याची पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत.

सदर योजना ही Maha DBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या लेखामध्ये योजना बद्दल संपूर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. याची पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत.

Biyane Anudan Yojana

सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

सन 2014-15 पासून बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सन 2018-19 व 2019-20ही वर्षे केंद्र शासनाने पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) वर्षे म्हणून जाहीर केली आहेत. त्यास अनुसरून सन 2018-19 पासून केंद्र शासनाने

  • पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अभियानात बदल करून
  • दोन स्वतंत्र अभियाने राबविण्याचे धोरण अंगिकारले आहे.
  • त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – भरडधान्य अंतर्गत मका पिक
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरु केली आहेत
  • या दोन अभियानांसाठी अभियाननिहाय नव्यानेच स्वतंत्र नियतव्यय निर्धारित केला आहे. Biyane Anudan Yojana

बियाणे वितरण 2021

  • या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येईल.
  • वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.
  • विविध कृषी अवजारे या घटकांचा लाभ पाहण्याकरिता कृपया दस्तऐवज पहा.
  • बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके) Biyane Anudan Yojana

Overview of mahadbt Biyane Anudan Yojana

योजनेचे  नाव   Biyane Anudan Yojana
योजनेचे कार्यक्षेत्र संपुर्ण राज्य
जारी करणारा विभाग कृषी विभाग,महाराष्ट्र शासन
लाभ  बियाणे
लाभार्थी शेतकरी
अर्ज फॉर्म  ऑनलाईन

बियाणे अनुदान योजना पात्रता

1) केंद्र शासनाने पीकनिहाय निवडलेले जिल्हे खालीलप्रमाणे,

  • राअसुअ भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, व गडचिरोली (८ जिल्हे)
  • राअसुअ गहू – सोलापूर, बीड, नागपूर (३ जिल्हे)
  • राअसुअ कडधान्य – सर्व जिल्हे
  • राअसुअ भरडधान्य – (मका) सांगली, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव (एकूण ७ जिल्हे).
  • राअसुअ पौष्टीक तृणधान्ये (न्युट्री सिरीयल) – ज्वारी, बाजरी, रागी (एकूण २६ जिल्हे) Biyane Anudan Yojana
  1. ज्वारी – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ (एकूण २३ जिल्हे)
  2. बाजरी – नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद (एकूण ११ जिल्हे)
  3. रागी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे (पालघर सह), रायगड व रत्नागिरी. (एकूण ७ जिल्हे)
  4. कापूस: (अमरावती विभाग) – बुलढाणा,अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ (नागपूर विभाग) – वर्धा,नागपूर,चंद्रपूर.
  5. ऊस: (औरंगाबाद विभाग) – औरंगाबाद, जालना, बीड. (लातूर विभाग) – लातूर,उस्मानाबाद,नांदेड,परभणी,हिंगोली.

– वरील नमूद केलेल्या जिल्ह्यात हरभरा बियाण्यांसाठी 10 वर्षांआतील वाणास रु. 25/ प्रति किलो 10 वर्षांवरील वाणास प्रति रु. 12 किलो.

Biyane Anudan Yojana Maharashtra

  • जर शेतकरी तांदूळ, गहू, डाळी,कापूस,ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर वरील दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील.
  • कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याला गळीतधान्य पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात गळीतधान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला
  • वृक्षजन्य तेलबिया पिके यामधून लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
  • संबंधीत शेतक-याचे स्वतःचे नावे ७/१२ व ८/अ उतारा असणे बंधनकारक राहील. “Biyane Anudan Yojana”

बियाणे अनुदान योजना- आवश्यक कागदपत्रे

1) ७/१२ प्रमाणपत्र
2) ८-अ प्रमाणपत्र
3) खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
4) केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
5) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
6) हमीपत्र
7) पूर्वसंमती पत्र

बियाणे अनुदान योजना- अनुदान, मर्यादा, अर्जाची अंतिम तारीख, निवड प्रक्रिया

  • अनुदान- सर्व बियाण्यांसाठी 50% अनुदान
  • मर्यादा- 2 हेक्टर पर्यंत मुदत दिली आहे.
  • अंतिम तारीख- 30 ऑगस्ट 2021 पासून 10 सप्टेंबर 2021 पर्यंत.
  • निवड प्रक्रिया- शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment