काय सांगता…पाच हजार रुपयात मिळतोय सोलार पंप….

सुरू असलेल्या प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेला शेतकऱ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता, या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी चढाओढ आणि रजिस्ट्रेशन करताना येणाऱ्या अडचणी यामुळे राज्यांमधील शेतकरी खूपच त्रास आहे.

pm Kusum yojana Maharashtra online application form

याच गोष्टीचा फायदा राज्यामधील आणि राज्याच्या बाहेरील लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन साठी खोट्या वेबसाईट बनवणे या खोट्या वेबसाईट वरती शेतकऱ्यांची माहिती भरून घेणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या व्हाट्सअप वरती खोटी सर्टिफिकेट आणि तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेमध्ये पात्र असल्याची खोटी डॉक्युमेंट पाठवणे.

डॉक्युमेंट पाठवल्यानंतर शेतकऱ्याकडून पाच हजार दहा हजार अशा प्रकारात पैशाची मागणी करणे आणि या पैशाचा भरणा गुगल पे फोन पे द्वारे करून घेणे आणि परत परत शेतकऱ्यांना पुढील प्रोसेस साठी पैसे वारंवार मागणे असे करून बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे.

१८०००० कुसुम सौर पंपासाठी कोटा झाला उपलब्ध

या फसवणुकीला आळा घालण्यासाठी महाऊर्जा वेबसाईट वरती या वेबसाईटची नावे तसेच जी वेबसाईट शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे अशा वेबसाईटची डोमेन नेम सुद्धा जाहीर केलेले आहेत यामुळे बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत ते अवेअर झालेले आहेत.

तरीसुद्धा शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीने फसवण्याचा डाव जो आहे तो या लोकांनी केलेला आहे आणि यामधीलच एक नवीन पद्धत जी की प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती कॉल करून त्यांना सांगितले जाते की तुम्ही या योजनेमध्ये पात्र झालेले आहेत आणि तुम्हाला पाच हजार रुपयांचा भरणा करायचा आहे पाच हजार रुपये भरल्यानंतर तुमच्या शेतामध्ये सोलर पंप लागून जाईल तुमची या योजनेअंतर्गत निवड झालेली आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार रुपये मध्ये तुमच्या शेतामध्ये सोलार पंप लागेल.

तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की आता फक्त पाच हजार रुपये द्या आणि तुमच्या एचपीनुसार जो काही तुमचा भरणा आहे तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोलार पंप लागल्यानंतर कंपनीला देऊ शकता यामुळे बऱ्याच शेतकरी या लोकांच्या जाळ्यात सापडले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये प्रमाणे या लोकांना गुगल पे फोन पे द्वारे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.

pm kusum yojana maharashtra new registration process

कुसुम सोलार योजनेचे नवीन अर्ज सुरू …लगेच अर्ज करा

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment