
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यात यावा यासाठी महाऊर्जामार्फत एक नवीन योजना सुरू केलेले आहे. महामोर्चामार्फत नवीन सुरू केलेल्या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यात यावं यासाठी त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
पीएम कुसुम या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अगदी कमी लाभार्थी रकमेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या शेतकऱ्यांच्या पात्रतेनुसार आणि त्या पात्रतेच्या अटीनुसार त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप लावण्याचे काम केले जाते आणि या सोलर पंपामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणे शक्य होणार आहे.
पीएम कुसुम या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठीची जाहिरात या आधीच आलेली आहे आणि बरेच शेतकऱ्यांनी या आधी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेले आहे. जर तुम्ही पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थी म्हणून अर्ज करूंचीत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.
कुसुम सोलार योजना लवकरच नवीन अर्ज सुरू होणार | kusum solar pump yojana maharashtra
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेला शेतकऱ्यांमधून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आलेला कोटा लगेच संपला जातो आणि बरेच शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहतात .
अशाप्रकारे चेक करा कुसुम सोलार योजनेचा उपलब्ध होता
जर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीएम कुसुम योजनेसाठीचा कोटा उपलब्ध असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन साठी अर्ज करू शकता आणि आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसू शकता. आपल्या जिल्ह्यातील कोटा चेक करण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस करावी लागेल यानंतर आपल्याला समजेल की आपल्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध आहे किंवा नाही.
- सर्वात पहिला आपल्याला महाऊर्जा वेबसाईट वरती जायचंय
- महाउर्जेच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन टॅब वरती क्लिक करायचे
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर मोबाईल नंबर आणि आपल्या गावाचे नाव जिल्हा तालुका या सर्व गोष्टी भरणे गरजेचे आहे.
- तुमची वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमची कास्ट ची निवड करायचे.
- कार्डची निवड केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस भरणे गरजेचे आहे.
- आपल्या समिती ऑप्शन वरती क्लिक करायचे.
- अर्ज सबमिट करण्यासाठी जर तुमच्या जिल्ह्याचा कोटा अवेलेबल असेल तर तुमचा अर्ज सबमिट होईल.
- जर कोटा अवेलेबल असेल तर तुम्हाला दाखवले जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती एचपी साठी किती प्रमाणात कोटा हा उपलब्ध आहे.
- जर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असेल तर तुम्ही अर्ज पूर्ण करू शकता आणि आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसू शकता.
तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेचा आपल्या जिल्ह्यामधील उपलब्ध कोटा पाहू शकता.
कुसुम सोलार पंप योजनेसाठी नवीन कोटा आला लगेच अर्ज करा या वेबसाईट वरती
जर तुमच्या जिल्ह्याचा कोटा उपलब्ध असेल तर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचे आणि कशाप्रकारे पीएम कुसुम या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण दिलेली आहे या लिंक वरती क्लिक करून आपण या योजनेविषयीची सविस्तरपणे माहिती वाचू शकता.