
राज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं यासाठी राज्य सरकारने महाऊर्जामार्फत राज्यांमध्ये महा कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत पीएम कुसुम नावाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावं यासाठी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी सोलार पंप बसवण्यात येतात.
शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे आणि या अनुदाना अंतर्गत पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीच्या क्षेत्रानुसार आणि त्या शेतकऱ्यांच्या पात्रतेच्या अटीनुसार तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी चे सोलार पंप वितरित करण्यात येत आहेत.
तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी महा कृषी ऊर्जा अभियान मार्फत पीएम कुसुम या योजनेचे लाभ घेण्याचे आव्हान महाऊर्जामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक राज्यामध्ये आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ठराविक कोटा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा कोटा पूर्ण झाल्यानंतर महाऊर्जा तर्फे ऑनलाइन रजिस्ट्रेशन पोर्टल तसेच संकेतस्थळ बंद करण्यात येईल.
कुसुम सोलार योजना लाभार्थी हिस्सा
प्रवर्ग खुला दहा टक्के लाभार्थी हिस्सा
तीन एचपी 19 हजार 380 रुपये,
पाच एचपी– २६,९७५ रुपये
, साडेसात एचपी– 37 हजार 440 रुपये
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती पाच टक्के लाभार्थी हिस्सा
3 एचपी– नऊ हजार सहाशे नव्वद रुपये
पाच एचपी– १३४८८ रुपये
साडेसात एचपी– अठरा हजार 720 रुपये
वरील दिलेल्या लाभार्थी त्यानुसार ज्या त्या शेतकऱ्यांना त्यांच्या लाभार्थीशाची रक्कम आपली निवड झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने महाऊर्जा ऑफिसला भरवयाची आहे.
सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
वरील दिलेल्या अटीनुसार जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाऊर्जाच्या अधिकारीक वेबसाईट वरती जाऊन कुसुम सोलार योजनेसाठी र
जिस्ट्रेशन करावे. आणि आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करून बाकीची प्रोसेस पूर्ण करून कागदपत्रे अपलोड करणे तसेच आपल्या लाभार्थी हिश्याचे पेमेंट करणे आणि आपला सेल्फ सर्वे करणे गरजेचे आहे.
कुसुम सोलार योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे
- कुसुम सोलार योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल वरती किंवा आपल्या लॅपटॉप वरती क्रोम वरती जाऊन महाऊर्जा सर्च करायचा आहे.
- महाऊर्जा या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे.
- महाऊर्जा वेबसाईट लिंक वरती क्लिक करा
- आपल्यासमोर एक नवीन अर्ज ओपन होईल यामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती आणि आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर सर्व माहिती बघून आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
- रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे अपलोड करणे आणि आपल्या पंपाची निवड करणे तसेच आपल्याला लाभार्थी विषयाचा भरणा करणे.
- या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये सर्वे होऊन आपल्या शेतामधील पाहणी करून तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या शेतामध्ये त्या क्षमतेचा सोलार पंप बसवण्यात येईल.
या सर्व गोष्टी पूर्ण केल्यानंतरच आपल्याला वेंडर सिलेक्शन चा ऑप्शन येईल आणि त्यानंतरच आपल्या शेतामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपल्या लाभार्थी हिस्स्यानुसार त्या क्षमतेचा पंप आपल्या शेतामध्ये विस्थापित करण्यात येईल.