लंपी आजारामुळे जनावर दगावल्यास शासनाची मदत जाहीर | LSD compensation 2022

लंपी आजारा

लंपी आजारा ने बाधित जनावराचा मृत्यू झाल्यास अशा जनावरांकरिता शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. LSD COMPENSATION 2022 लंपी आजारा

लंपी आजारा केंद्र शासनाच्या प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंपी चर्मरोग हा अनुसूचित रोग आहे.

राज्यात दि 4- 8- 2022 रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमत गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लंपी चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे.

विषाणूजन्य लंपि चर्मरोग प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे तदनंतर सध्या स्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे.

राज्यातील उद्भवलेल्या लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजना याबाबत दिनांक 12.9.2022 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाला वस्तुस्थिती अवगत करण्यात आलेली आहे.

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याचवेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात.

लंपी आजारा GR 2022

राज्यात लांपी चर्मरोग प्रदर्भवामुळे ज्या शेतकरी पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे शंभर टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य देण्याबाबत ( LSD compensation 2022 ) तसेच सदर बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्याचे मंत्रिमंडळाने निर्देशित दिलेले आहेत.

या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशानुसार एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

GR – राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी / पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य देण्याबाबत.

1 दुधाळ जनावरे गाय व म्हशी मोठे दुधाळ जनावरे प्रति जनावर ₹30,000/- 3 जनावरे पर्यंत.

2 ओढ काम करणारे जनावरे बैल ₹25,000/- करणारी मोठी जनावरे मर्यादा 3

3 वासरे ₹16,000/- मर्यादा 6 ओढकाम करणारी लहान जनावरे पर्यंत.

लंपी चर्मरोगामुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाच्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसाह्यस मंजुरी ( LSD compensation 2022 ) देण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

MJPSKY List 2022 Download | Mahatma Phule Shetkari Karj Mafi Yadi 2022 | karj mafi yadi

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष, निवासी उपजिल्हअधिकारी /जिल्हा अधिकारी यांनी नामनिर्देशित केलेला उपजिल्हा अधिकारी दर्जाचा अधिकारी सदस्य, जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त सदस्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सदस्य, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुपशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय संबंधित सदस्य, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय सदस्य सचिव असणार आहेत.

ज्या शेतकरी पशुपालक कार यांच्याकडील पशुधन लंपी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडले आहे अशा शेतकरी पशुपालकांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संबंधित पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक यांना द्यावयाचे आहे.

संबंधित शेतकरी पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरिक यांच्या प्रत्येक क्षण उपस्थित पशोधन मृत्युमुखी पडल्या बाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे.

सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लंपी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे सदरचा पंचनामा संबंधित पशुपालन विकास अधिकारी सहाय्यक, पशुधन विकास अधिकारी पशुधन पर्यवेक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका, लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्याकडे किंवा तालुका स्तरावर ही संस्था नसल्यास लगतच्या तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुक्यात लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्याकडे तात्काळ शक्यतो त्याच दिवशी सादर करावा.

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय हे सदरचा पंचनामा अर्थसाह्य मंजूरी ( LSD compensation 2022 ) देण्यासाठी उपरोक्त प्रमाणे गठीत केलेल्या समितीचे सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांच्याकडे त्वरित पाठवतील.

उपरोक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने शेतकरी पशुपालकांकडे पशुधन लंपी चर्मरोग प्रादुर्भावामुळेच मृत्यू पावला असल्याची प्राप्त पंचनामेच्या आधारे खतरजमा करून संबंधित शेतकरी पशु पालक यांना अर्थसहाय्यम मिळणेस्तव तशी शिफारस एक आठवड्याच्या आत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे मंजूर करून पाठवावे. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सदर अर्थसाह्याची रक्कम संबंधित शेतकरी पशुपालक यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसाच्या आत थेट डीबीटी द्वारे LSD compensation 2022 जमा केली जाईल

Nuksan bharpai 2022 गोगलगाय मुळे सोयाबीनचे नुकसान, बाधित शेतकऱ्यांना मदत वितरीत

PM Kisan e-KYC करण्यासाठी मुदत वाढवली | PM Kisan Yojana e-KYC 2022 | OTP Aadhar Update

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment