मुख्यमंत्री सोलार कृषी पंप 2023 योजनेचे अर्ज नोंदणी सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे शेतकरी आपल्या शेतामध्ये विहिरीवरती सोलार कृषी पंप बसवण्यासाठी इच्छुक आहेत अशा शेतकऱ्यांना आपल्या विहिरी वरती सोलर पंप बसवण्याची अजून एक संधी जी आहे ती भेटलेली आहे.
पण या योजनेअंतर्गत फक्त तेच शेतकरी पात्र आहेत की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीवरती लाईट कनेक्शन घेण्यासाठी डिमांड भरलेले आहे आणि ते शेतकरी वाट पाहत आहेत की आपल्या विहिरी वरती लाईट कनेक्शन विस्थापित होण्याची.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आता वर्षाचे 12000 रुपये
फक्त अशा शेतकऱ्यांना आता 50 हजार सोलार पंप मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहेत तर आज पासून अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती एसएमएस येण्यास सुरुवात झालेली आहे की जर ते शेतकरी आपण भरलेली जी काही डिमांड ची रक्कम वजा करून नवीन येणारी सोलर पंपाची किंमत भरण्यास तयार आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्या विहिरी वरती लाईट कनेक्शनच्या ऐवजी सोलार पंप बसवून देण्यात येईल.
तर आजपासून शेतकऱ्यांच्या मोबाईल वरती अशा प्रकारचे एसएमएस येण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्हालाही अशा प्रकारचा एसएमएस आला असल्यास तुम्हाला जर तुमच्या विहिरीवरती सोलर पंप बसवायचा असल्यास तुम्ही एसेमेस मध्ये आलेल्या लिंक वरती क्लिक करून आपली नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हाल आणि आपल्या विहिरीवरती सोलर पंप पासून घेऊ शकता.

ज्या शेतकऱ्यांना आपल्याला विहिरीवरती लाईट कनेक्शनच हवे आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा या लीप वरती क्लिक करायचंय आणि तुम्ही या योजनेसाठी इच्छुक नाही आहात अशा प्रकारचा ऑप्शन तिथे निवडायचा आहे जेणेकरून तुम्ही या योजनेमधून बाजूला केले जाईल आणि तुम्हाला तुमच्या विहिरीवरती लाईटचं कनेक्शन देण्यात येईल.
50 हजार रुपये अनुदानाची चौथी यादी जाहीर | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000
1 thought on “मुख्यमंत्री सोलार कृषी पंप 2023 योजनेचे अर्ज नोंदणी सुरू”