Nuksan bharpai 2022 गोगलगाय मुळे सोयाबीनचे नुकसान, बाधित शेतकऱ्यांना मदत वितरीत

Nuksan bharpai 2022 गोगलगाय मुळे सोयाबीनचे नुकसान, बाधित शेतकऱ्यांना मदत वितरीत

शंखी गोगलगाईच्या प्रादुर्भाव मुळे बाधित झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ₹१३,८०० ( Nuksan bharpai 2022) मदत वितरीत, GR आला.

Nuksan bharpai 2022

राज्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान ( nuksan bharpai 2022) दिले जाते.

हे निविष्ठा अनुदान एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहीत दराने मदत म्हणून देण्यात येते.

सेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानेकरिता मदत देण्याबाबत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी रु6800/ प्रति हेक्टर 2 हेक्टरांच्या मर्यादित दिल्या जाणाऱ्या मदती ऐवजी रु13600 प्रति हेक्टर 3 हेक्टर यांच्या मर्यादित मदत दिली जाणार आहे.

तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी ₹13,500/-प्रती हेक्टर 2 हेक्टर मर्यादित रुपये प्रति हेक्टर ऐवजी २७,००० रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.

याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणारी ₹१८,००० प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित असलेली मदत आता ₹३६,००० प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित दिली जाणार आहे.

तसेच इतर नुकसानी करिता ही मदत जाहीर करण्यात आली आहे मात्र याचबरोबर चालू हंगामामध्ये लातूर उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शंकी गोगलगायी मुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य शासनास प्राप्त झाला होता.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये या नैसर्गिक आपत्तीचा समावेश आहे यामुळे राज्यमंत्रिमंडळाच्या दिनांक 16- 8- 2022 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार चालू हंगामातील शंखी गोगलगायीमुळे झालेल्या शेतीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून विहित नमुन्यात निधी मागण्याची प्रस्तावना प्रस्ताव शासनाकडे अशा स्वरूपाच्या सूचना दिनांक 25- 8- 2022 च्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडून गोगल गाई मुळे शेती पिकांच्या झालेले नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचा प्रस्ताव ०६ सप्टेंबर २०२२ रोजी शासनास पाठवला होता.

आणि याच प्रस्तावानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांचे नुकसान करिता मदतीचे ( nuksan bharpai 2022 ) वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, यासाठी दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करून ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

शासन निर्णय PDF खालील लिंक वर क्लिक करा

चालु हंगामामध्ये शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत..

चालू हंगामातील लातूर उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंकी गोगलगायीमुळे झालेले नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून एकूण 9858.80 लक्ष इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्याना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे.

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment