Pik vima yojana 2022 नवीन अर्ज करण्यास सुरवात हि आहे शेवट तारीख | पिक विमा योजना

खरीप हंगाम सन 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) राज्यात ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राबविण्याकरिता ०१ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना राबवत असताना या योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत .
राज्यात २०२१ – २३ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड मॉडेल ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) नुसार लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाने कप ॲन्ड कॅप मॉडेल नुसार बीड पॅटर्न Pik vima beed pattern लागू केला आहे.
ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत खरीप हंगाम 2022 या हंगामाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद घेण्यात यावी.
विमा योजनेत विमा घेतलेले पिक व ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतिम गृहित धरण्यात येईल.
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ साठी लागणारी कागदपत्रे :–
रीप हंगाम सन 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे —
- आधार कार्ड
- 7/12 व 8 अ (हि कागदपत्रे हि तलाठी च्या सही व शिका असणारी पाहिजेत )
- पिक पेरा प्रमाणपत्र
- बँक पासबुक
ही कागदपत्रे आसने आवशक आहेत .
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ चे अर्ज कुटे भरावेत ?
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ चे online अर्ज आपल्या जवळील CSC CENTER भरले जातील तसे च आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर सुद्धा हे अर्ज स्वीकारले जातील ,
तसेच शेतकरी आपल्या mobile वरून सुद्धा घर बसल्या प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ चे अर्ज भरू शकतात
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ अर्ज भरण्याची शेवट तारीख काय आहे ?
प्रधानमंत्री पिक विमा यो.जना २०२२ च्या योजनेचे अर्ज भरण्याची शेवट तारीख ही ३१ जुलै २०२२ ही आहे , तसेच ही तारीख पुढे जाऊन वाढू शकते , पण सर्व शेतकर्यांना विनंती आहे की त्यांनी आपले अर्ज हे ३१ जुलै २०२२ च्या आत भरून submit करावे .
प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२२ online भरण्यासाठी आपण हा आपल्या spotlightmarathi info या YouTube channel वरील विडीओ मध्ये पाहू शकता :–
1 thought on “Pik vima yojana 2022 नवीन अर्ज करण्यास सुरवात हि आहे शेवट तारीख | पिक विमा योजना”