नवा बदल नवी योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राज्यात राबविण्यास मंजुरी, अर्ज सुरू.

Pik vima yojana 2022

खरीप हंगाम सन 2022 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) राज्यात ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राबविण्याकरिता ०१ जुलै २०२२ रोजी शासन निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.

ही योजना राज्यात २०२२ मध्ये राबवत असताना या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

याच योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी दि 31 जुलै पर्यंत आपला विमा हप्ता भरुन सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून केले आहे.

राज्यात २०२१ – २३ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना बीड मॉडेल ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) नुसार लागू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य शासनाने कप ॲन्ड कॅप मॉडेल नुसार बीड पॅटर्न Pik vima beed pattern लागू केला आहे.

या योजनेंतर्गत अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पुर, कीड आणि रोगासारख्या संकटामुळे शेतीच्या होणा-या नुकसानापोटी शेतक-यांना भरपाई देण्यात येणार आहे.

या योजनेत 80-110 सुत्रानुसार बीड पॅटर्न पिक विमा योजना ( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राज्यभर राबविण्यात येणार आहे.

या पॅटर्न नुसार विमा कंपन्यांना नुकसान भरपाई पोटी 110 टक्के पेक्षा अधिक रक्कम द्यावी लागली तर त्याचा भार राज्य व केंद्र शासन उचलणार आहे.

तर या उलट कंपनीला 80% पेक्षा कमी रक्कम द्यावी लागल्यास शेतक-यांना दिलेली मदत अधिक 20 % नफा ठेऊन कंपनीला उर्वरीत रक्कम राज्य सरकारला परत द्यावी लागणार आहे.

Pik vima yojana 2022 – Beed Pattern

या योजनेअंतर्गत पिक विमा काढतांना शेतक-यांना रब्बीसाठी 1.5 टक्के तर खरीप हंगामासाठी 2 टक्के इतका विमा हप्ता भरावा लागेल.

तर खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस व कांदा पिकासाठी 5 टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागणार आहे. विमा हप्त्याची उर्वरीत रक्कम राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात भरणार आहे.

Pik vima yojana 2022

यासाठी राज्यात खालीलप्रमाने जिल्हा निहाय पीक विमा कंपनी मार्फत विमा योजना राबवली जाणार.

अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एच डी एफ सी अर्गो इन्शुरन्स कंपनी असणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY )

सोलापूर, जळगाव, सातारा, औंरगाबाद, भंडारा,पालघर,रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी असणार आहे.

हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्यासाठी आयसी आयसी आय लोंबार्ड कंपनी असणार आहे.

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया ही कंपनी असणार आहे.

तर बीड जिल्ह्यासाठी बजाज अलायंज या कंपनीच्या माध्यमातून ही पीक वीमा योजना राबवली जाणार आहे.

सदर पिक विमा योजना ही अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकांसाठी असणार आहे.

यात खरिप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमुग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत खरीप हंगाम 2022 या हंगामाकरीता जोखिमस्तर सर्व अधिसुचित पिकांसाठी 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद घेण्यात यावी.

विमा योजनेत विमा घेतलेले पिक व ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक अंतिम गृहित धरण्यात येईल.

Draupadi Murmu biography in Marathi | राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे चरित्र

नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकाऱ्याना मिळणार ५०हजार अनुदान फक्त हे पात्र pik karj anudan

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

2 thoughts on “नवा बदल नवी योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना( Pik vima yojana 2022 – Beed Pattern ) राज्यात राबविण्यास मंजुरी, अर्ज सुरू.”

Leave a Comment