प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सुरू असलेल्या प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2021 या वर्षी रजिस्ट्रेशन केले होते, आणि त्यांनी त्यांचा अर्ज पूर्ण केला होता अशा शेतकऱ्यांच्या याद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलेल्या होत्या.

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना या यादीमधील नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना आज दुपारी चार वाजल्यापासून त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ते शेतकरी कुसुम सोलार योजनेमध्ये पात्र असल्याचा मेसेज आणि त्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरावयाची लाभार्थी रक्कम यांचा मेसेज हा त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल नंबर वरती पाठवण्याचे काम मेडा कार्यालय करून सुरू झालेले आहे.
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना नवीन अपडेट
जर आपण 2021 या वर्षी अर्ज केला असेल आणि अजून पर्यंत जर आपल्याला पैसे भरण्याचा ऑप्शन आलं नसेल तर लवकरच आपल्याला आपल्या मोबाईल वरती हा एसएमएस प्राप्त होऊ शकतो, हा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जाचा शेतामध्ये जाऊन सेल्फ सर्वे करायचा आहे.
शेत सर्वे केल्यानंतर आपल्याला आपली लाभार्थी रक्कम भरण्यासाठी ची टॅब ओपन होईल आणि आपण आपली लाभार्थी रक्कम ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
आज दुपारी चार वाजल्यापासून सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती मेढा कार्यालयाकडून एसएमएस पाठवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे तसेच येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांना सर्व पात्र शेतकऱ्यांना हे एसेमेस मिळण्याची आशा आहे.
जर आपल्याला हा एसएमएस प्राप्त झाला असेल तर आपण आपल्या शेतामध्ये सर्वे करून घ्यावा आणि आपली लाभार्थी रक्कम भरून या योजनेचा लाभ मिळवावा.