रेशन कार्ड धारकांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट….

रेशन कार्ड धारकांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट….

रेशन कार्ड धारकांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट…. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर आता दिवाळी साठी या आपल्याला १०० मध्ये काही वस्तू रेशन मध्ये मिळणार आहेत .

या गिफ्ट मध्ये असणार या वस्तू .. पहा लिस्ट

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

कधी होणार वाटप

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

रेशन कार्ड धारकांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट....

रेशन कार्ड धारकांना मिळणार दिवाळीचे गिफ्ट….

PMGKAY 2022 मोफत धान्य आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment